वेतनवाढीसाठी गेल्या चार दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर आज (शनिवार) सकाळपासून मागे घेण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने संप बेकायदेशीर असून, त्यांनी तत्काळ कामावर रुजू व्हावे, असे आदेश दिले आहे. न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसाठी समिती नेमण्याचे आदेश सरकारला दिले आहेत.
सरकारने संपावर तोडगा काढण्यासाठी अद्याप समिती का नेमली नाही? असा सवाल न्यायालयाने सरकारला केला. त्यावर सरकारने तत्काळ चार सदस्यीय समिती नेमण्याची तयारी दर्शवली. न्यायालयाने संप बेकायदेशीर असल्याचे सांगत कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यास सांगितले. त्यानंतर शुक्रवारी मध्यरात्री एसटी कर्मचाऱ्यांच्या कोअर समितीच्या बैठकीत संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. चार दिवसांनंतर संप मागे घेण्यात आल्याने आज भाऊबीजेच्या दिवशी राज्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
सार्वजनिक सेवेत असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना नागरिकांना वेठीस धरून संप करता येणार नाही, अशा शब्दांत हायकोर्टाने कर्मचाऱ्यांना खडसावले आहे. राज्य शासनाने सोमवारपर्यंत पाच सदस्यीय उच्चाधिकार समिती नेमावी. या समितीने पगारवाढीवर चर्चा करून 15 नोव्हेंबरपर्यंत अहवाल सादर करावा तसेच डिसेंबरपर्यंत अंतिम अहवाल द्यावा, असेही आदेश न्यायालयाने दिले आहेत.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews